Posts

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन

  रायगड,दि.23(जिमाका):- मा.भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि.16 मार्च 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्याल आली आहे. 32- रायगड /33 मावळ लोकसभा मतदार संघामधील विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी पुढीलप्रमाणे नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून या नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्रमांक पुढीलप्रमाणे आहेत. विधानसभा मतदार संघ - 188 पनवेल, नियंत्रण कक्ष क्रमांक 022-27452399, 189-कर्जत, नियंत्रण कक्ष क्रमांक 9373922909, 190-उरण, नियंत्रण कक्ष क्रमांक 9892538409, 191-पेण, नियंत्रण कक्ष क्रमांक 02143. 253032, 192- अलिबाग, नियंत्रण कक्ष क्रमांक 02141-222042, 193- श्रीवर्धन, नियंत्रण कक्ष क्रमांक 02147-222226/7249579158, 194-महाड, नियंत्रण कक्ष क्रमांक 7385815210, 263- दापोली, नियंत्रण कक्ष क्रमांक 02352-226248,264- गुहागर, नियंत्रण कक्ष क्रमांक 02356-264888 त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, रायगड यांचे कार्यालयात निवडणूकीसंदर्भात नागरिकांकडून येणाऱ्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रार

32-रायगड लोकसभा निवडणूक-2024 उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण व भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याच्या कार्यवाहीसाठी समित्या गठीत

    रायगड,दि.23(जिमाका):- आगामी लोकसभा निवडणूक-2024च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी खर्च नियंत्रण समित्ती गठीत करण्यात आली असून या खर्च नियंत्रण समितीमध्ये  श्री.धिरेंद्र मनी त्रिपाठी, खर्च निरीक्षक (अध्यक्ष), श्री.किशन जावळे (भा.प्र.से.), जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड, श्री.राहुल केशय कदम, खर्च संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणूक- 2024 च्या अनुषंगाने 32-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांच्या खर्च विषयक लेख्यांची तपासणी करण्यासाठी उमेदवारांना पुढीलप्रमाणे वेळापत्रक आखून देण्यात आले आहे. तपासणी वेळापत्रक पुढीलप्रमाणे  पहिली तपासणी- दि.25 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00. दुसरी तपासणी- दि.30 एप्रिल 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00. तिसरी तपासणी-दि.04 मे 2024, वेळ सकाळी 10.00 ते सायंकाळी 5.00 होणार आहे. सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचार मोहिमेच्या कालावधीतील सर्व लेखे/खर्चाच्या नोंदवह्या अद्ययावत करून नमूद केलेल्या तारखांना राजस्व सभागृह, जिल

32 रायगड लोकसभा मतदारसंघासाठी 13 उमेदवार निवडणूक रिंगणात 8 जणांनी घेतली माघार --जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे मतदार संघात एकूण 16 लक्ष 68 हजार 372 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    रायगड,दि.22(जिमाका):-लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या तिसऱ्या टप्प्यासाठी  32-रायगड लोकसभा मतदारसंघात आजच्या नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर 13 उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.  निवडणूक निर्णय अधिकारी यांचे समक्ष स्वतः उपस्थित राहून एकूण 21 वैध उमेदवारांपैकी 8 जणांनी  माघर घेतली आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहामध्ये निवडणूक प्रक्रिये बाबत माहिती देताना पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी श्री. जावळे बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे आदी उपस्थित होते. रायगड लोकसभा मतदारसंघात 13 उमेदवारांमध्ये निवडणुकीची लढत होणार असून उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे-- 1) श्री.अनंत पद्मा गिते (अपक्ष)( गळ्याची टाय), 2)श्री.अनंत बाळोजी गिते (अपक्ष)( चिमणी), 3) श्री.अनंत गंगाराम गिते, (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे) ( मशाल), 4) श्री.नितीन जगन्नाथ मयेकर, (अपक्ष) (पत्रपेटी), 5) श्री.

रायगड लोकसभा मतदारसंघ निवडणूक 2024 साठी 21 उमेदवारांचे अर्ज वैध 7 उमेदवारांचे अर्ज अवैध

    रायगड(जिमाका) दि.20:-  32- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून 7 उमेदवारांचे 13 नामनिर्देशनपत्रे अवैध ठरले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया पार पडली. 7 उमेदवारांचे अर्ज अवैध 1)श्री.अनिकेत सुनील तटकरे, ( नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,) 2)श्री.नरेश गजानन पाटील,(अपक्ष) 3) श्री.मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी, (बहुजन समाज पार्टी) 4)श्री.उस्मान बापू कागदी,(अपक्ष) 5) श्री.अनिल बबन गायकवाड,(बहुजन समाज पार्टी) 6) श्री.भुपेंद्र नारायण गवते,(अपक्ष) 7)   श्री.घाग संजय अर्जुन,(अपक्ष)

32-रायगड लोकसभा मतदार संघात शेवटच्या दिवशी 19उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी एकूण 28 उमेदवारांचे 40 नामनिर्देशनपत्र

  रायगड,दि.19(जिमाका) :-  32 रायगड लोकसभा मतदार संघांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी (दि.19 एप्रिल) 19 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले असून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी मतदार संघात एकूण 28 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी दिली. 32-रायगड लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. प्राप्त सर्व नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया दिनांक 20 एप्रिल रोजी होणार आहे. माघार घेण्याची दिनांक 22 एप्रिल 2024  आहे. आज अखेरच्या दिवसापर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या सर्व उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे .. 1) श्री.अनंत गिते, (अपक्ष) (1 अर्ज ), 2)श्री.अनंत बाळोजी गिते, (अपक्ष)) (1 अर्ज ), 3) श्री. अनंत गंगाराम गिते, (1+ 3 अर्ज) (शिवसेना)उद्धव बाळासाहेब ठाकरे), 4) श्री. नितीन जगन्नाथ मयेकर, अपक्ष (1), 5)श्री. आस्वाद जयदास पाटील, अपक्ष (1). 6)श्री. मंगेश पद्माकर कोळी, (अपक्ष)(1अर्ज), 7)श्री.प्रकाश बाळकृष्ण चव्हाण,3 अर्ज,(भारतीय जवान किसान पार्टी) 8) श्री.पांडुरंगदामोदर चौले,1

जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी राज्यात विशेष मोहिम मागासवर्गीय विद्यार्थ्यांना अर्ज दाखले करण्याचे आवाहन

  रायगड (जिमाका) दि.15:-  सामाजिक न्याय व विशेष  सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यात दि.10 ते दि. 25 एप्रिल 2024 या कालावधीत समता पंधरवडयात जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम सुरु करण्यात आली आहे.  इ.11 वी व इ. 12 वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या, तसेच अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत असलेल्या व पुढील उच्च शिक्षणाकरिता व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळावे. जात वैधता प्रमाणपत्राअभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापासून वंचित राहू नये, याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.      ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरीत अर्ज सादर करावेत.  ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत, परंतु अद्याप वैधता प्रमाणपत्र मिळाले नाही. अशा विद्यार्थ्यांनी दि.22  ते 26 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात हजर राहून त्रुटींची पूर्तता करावी.  वेळेत वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी समितीस पुरेसा अवधी मिळावा. तसेच वेळेत जात व

निवडणूक खर्च निरीक्षक श्री.त्रिपाठी यांची जिल्हा माध्यम कक्षास भेट

Image
  रायगड(जिमाका),दि.13:- लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2024,  32 रायगड लोकसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक धिरेंद्रमणी त्रिपाठी यांनी जिल्हा माध्यम कक्षात भेट देऊन जिल्हा माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.           जिल्हा माध्यम कक्षातून जिल्हा निवडणूक प्रशासनाच्या वतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक संबंधी प्रसार माध्यम व वृत्तपत्र प्रतिनिधी यांच्याशी समन्वय राखला जात आहे. यासाठी माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आले असून उमेदवारांच्या प्रचार जाहिराती याचे प्रमाणीकरण करण्याची कार्यवाही केली जाते. यासह निवडणुकीची मतदान जागृतीसाठी विविध उपक्रमांच्या प्रसिद्धीमध्ये या पक्षाचा सहभाग आहे आधी बाबतची माहिती जिल्हा माहिती अधिकारी मनीषा पिंगळे यांनी यावेळी दिली.               श्री.त्रिपाठी यांनी माध्यम कक्षातील इलेक्ट्रॉनिक मीडिया सेल, समाज माध्यम द्वारे प्रसिद्धी, तसेच विविध दैनंदिन अहवाल बाबत पाहणी त्यांनी केली. निवडणूक निरीक्षक श्री. त्रिपाठी यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष देण्याचे निर्देश यावेळी दिले. तसेच पेडन्यूज बाबत अधिक दक्ष रहावे